[ad_1]
माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली मेट्रो राईड, एक्वा मार्गिकेवर केला प्रवास
नागपूर : महा मेट्रो तर्फे सर्व नागपूरकरांना एक सुयोग्य प्रवास सेवा मिळत असून शाहिरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि महा संचालक, माहिती व जन संपर्क विभाग, श्री दिलीप पांढरपट्टे यांनी आज केले. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दोन मार्गिका सुरु असून उर्वरित दोन मार्गिका देखील लौकरच सुरु होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
श्री दिलीप पांढरपट्टे व संचालक नागपूर विभाग श्री हेमराज बागुल यांनी आज मेट्रोचा प्रवास केला. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर आणि परत असा त्यांचा हा प्रवास झाला. शासकीय कामानिमित्त नागपूरला आलेले श्री दिलीप पांढरपट्टे यांनी आवर्जून एक्वा मार्गिकेवरील हा प्रवास केला. सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन वर आगमन झाल्यावर त्यांचे आणि श्री बागुल यांचे महा मेट्रो तर्फे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.
प्रवास पूर्ण झाल्यानंतर श्री दिलीप पांढरपट्टे यांनी हि राईड आपल्या करता अतिशय आनंददायक होती असे म्हटले. मेट्रो सेवा नागपूर करता अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, आणि इतर नागपुरकर या सेवेचा नक्की लाभ घेतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. नागपूरला आल्यावर येथील मेट्रो संबंधी आपले कुतूहल जागृत झाले आणि म्हणूनच मेट्रो राईड करण्याचा आपण निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
एक्वा मार्गिकेचा हा प्रवास अविस्मरणीय होता, असे देखील ते म्हणाले. नागपूर मेट्रोचा प्रवास अतिशय सुखाचा आहे याचा अनुभव आपल्याला आला आहे आणि हीच प्रचिती नागपूरकरांना देखील येत आहे असेही ते म्हणाले. नागपूरकर मेट्रोला चांगला प्रतिसाद देत असून पुढे हा प्रतिसाद वृद्धिंगत होईल, हि आशा त्यांनी व्यक्त केली. या आधी श्री श्री दिलीप पांढरपट्टे, श्री हेमराज बागुल व माहिती व जन संपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोने राईड करत मेट्रोच्या कार्या आणि संचालना विषयी अधिकाऱ्यांशी महा मेट्रोशी संबंधी विषयावर माहिती घेतली.
Source link
[ad_2]
source https://earn8online.com/index.php/198406/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/
No comments:
Post a Comment